Join us

कामगारानेच केला चोरीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:07 IST

गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड़कामगारानेच केला चोरीचा बनावगुन्हे शाखेच्या चौकशीत उघडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालकाचे पैसे ...

गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड़

कामगारानेच केला चोरीचा बनाव

गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालकाचे पैसे घेऊन चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष २ने ही कारवाई केली आहे.

मनीष मार्केट येथे असलेले इंद्रान इकबाल मेमन यांच्याकडे आरोपी कर्मचारी मालाचे पैसे गोळा करण्याचे काम करत होता. अशात १८ जानेवारी रोजी मालकाने सांगितल्याप्रमाणे ते मनीष मार्केट येथून ३ लाख ६४ हजार रुपयांची रोकड घेऊन निघाला. त्याच दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता पायधुनी परिसरातून जात असताना कोणी तरी पाठीमागून धारदार शस्त्रांचा वापर करत बॅगेतूूून रोकड पळविली. यात पाठीलाही दुखापत झाल्याचे सांगत त्याने पायधुनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष २नेही सीसीटीव्हीच्या मदतीने समांतर तपास सुरू केला. अशात तपासात तक्रारदाराच्या जबाबात तफावत दिसून आली. त्यात आरोपी आणि तक्रारदार एकाच ठिकाणी राहात असल्याची माहिती समोर आली. त्यांनी मुंब्रा परिसरात आरोपीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. याबाबत त्यांनी तक्रारदाराकड़े उलट तपासणी सुरू केली. यात, त्यानेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने चोरीचा बनाव केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.