Join us

कांदिवलीत तीन गाईंची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:06 IST

तबेलेवाल्याला अटक; जोडप्याचा शोध सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तबेलेवाल्याने रस्त्यावर फिरायला सोडलेल्या तीन गाईंची चोरी झाल्याचा प्रकार ...

तबेलेवाल्याला अटक; जोडप्याचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तबेलेवाल्याने रस्त्यावर फिरायला सोडलेल्या तीन गाईंची चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एका तबेला चालकाला अटक केली असून, एका जोडप्याचा शोध सुरू आहे.

कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात फिरणाऱ्या तीन गाई चोरीला गेल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. यात एक महिला आणि एक पुरुष ज्याचे नाव मया असल्याचा पोलिसांना संशय असून ते गाईंना घेऊन जाताना दिसले. हे दोघे फुटपाथवर राहत असल्याने त्यांचा नेमका ठावठिकाणा नाही. चंड्रेश यादव नामक तबेला चालकाला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. यादवनेच जोडप्याला गाय चोरायला सांगितल्याचा संशय पोलिसांना आहे. चोरीला गेलेल्या गाईंची एकूण किंमत दीड लाख रुपये असून, सध्या पसार जोडप्याचा शोध पोलीस घेत आहेत.