Join us
Daily Top 2Weekly Top 5

केईएमच्या आॅपरेशन थिएटरमध्ये चोरी

By admin | Updated: June 9, 2015 01:50 IST

केईएम रुग्णालयातील आॅर्थोपेडिक्स विभागाच्या आॅपरेशन थिएटरमध्ये चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. एका कर्मचाऱ्याने लॉकरमध्ये ठेवलेले ३५ हजार आणि इतर काही वस्तू चोरीला गेल्या आहेत.

मुंबई : केईएम रुग्णालयातील आॅर्थोपेडिक्स विभागाच्या आॅपरेशन थिएटरमध्ये चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. एका कर्मचाऱ्याने लॉकरमध्ये ठेवलेले ३५ हजार आणि इतर काही वस्तू चोरीला गेल्या आहेत. केईएम रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीत चौथ्या मजल्यावर आॅर्थोपेडिक्सचे आॅपरेशन थिएटर आहे. या थिएटरमध्ये डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी २२ लॉकर आहेत. यापैकी ५ लॉकर तोडून पैसे आणि वस्तू रविवारी चोरीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणाची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी आॅपरेशन थिएटरला टाळे ठोकले. यामुळे दिवसभर येथे शस्त्रक्रिया झाली नाही. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. अंतर्गत निधी म्हणून कर्मचाऱ्यांनी गोळा केलेले ३५ हजार चोरीला गेले आहेत. (प्रतिनिधी)