Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्याच घरात चोरी

By admin | Updated: May 15, 2015 00:35 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चोरी, घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री बेलापूर गावात चक्क पोलीस शिपायाच्या घरामध्येच

नवी मुुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चोरी, घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री बेलापूर गावात चक्क पोलीस शिपायाच्या घरामध्येच चोरी झाली. चोरट्यांनी २ लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरी व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत आहेत. या गुन्ह्यांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आतापर्यंत चोरट्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते. परंतु आता पोलिसांच्या घरामध्येच चोरी होऊ लागली आहे. सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई असलेले राकेश म्हात्रे बेलापूर गावात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या घरामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीची काच काढून दोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. रात्री ११ ते दुपारी सव्वादोनच्या दरम्यान ही घटना घडली. याविषयी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसाच्या घरामध्येच चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एनआरआय पोलिसांनी या घटनेविषयी गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे.