Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करणारी महिला गजाआड

By admin | Updated: May 18, 2015 03:50 IST

शहरातील एका स्वीट मार्टमध्ये महिलेच्या पर्समधून ३२ हजार रुपयांची रोकड चोरून फरारी झालेल्या महिला आरोपीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील

महाड : शहरातील एका स्वीट मार्टमध्ये महिलेच्या पर्समधून ३२ हजार रुपयांची रोकड चोरून फरारी झालेल्या महिला आरोपीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे मुद्देमालासह गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. शोभा साठे (४०, रा. वाई, जि. सातारा) असे या आरोपीचे नाव असून ती सराईत चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर गोरेगाव माणगाव पोलीस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.२ मे ला सव येथील संजाली राक्षे ही महिला शिवाजी चौक येथील अन्नपूर्णा स्वीट मार्ट या दुकानात खरेदीसाठी गेली असता पर्समधून ३२ हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. शहर पोलीस ठाण्यात याबाबत राक्षे यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र स्वीट मार्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका महिलेने राक्षे यांच्याकडील रक्कम चोरून नेल्याचे चित्रीकरणावरून दिसून आले. या चित्रीकरणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विनायक माने यांनी तपाास केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून सदरची महिला माणगाव न्यायालयात येणार असल्याची खबर मिळाली. न्यायालयाच्या मार्गावर शोभा साठे हिला पोलिसांनी अटक केली. तिने चोरलेली ३२ हजार रुपयांची रक्कम तिच्या वाई येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतली. उपनिरीक्षक माने यांच्यासह महिला कॉन्स्टेबल कुंजन पाटील, पो. ना. सागर अष्टमकर यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)