Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून काढल्याच्या रागात मालकाकडे केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालकाने कामावरून काढले या रागातून दोन तरुणांनी त्यांच्या कंपनीत चोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालकाने कामावरून काढले या रागातून दोन तरुणांनी त्यांच्या कंपनीत चोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दोघांना अटक करीत त्यांची चौकशी सुरू केली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी हा कुरिअर कंपनीत कार्यरत होता. कामावर उशिरा आल्याने त्याच्या मालकाने त्याला कामावरून काढून टाकले. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच कंपनीत कार्यरत असलेल्या त्याच्या मित्राच्या मदतीने २५ ऑगस्ट, २०२१ रोजी ते दोघे ॲक्टिव्हावर बसून गोरेगावच्या त्यांच्या कुरिअर कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी चार लाखांची रोकड लंपास करीत पळ काढला. कंपनीत चोरी झाल्याची माहिती मिळताच कुरिअर कंपनी मालकाने त्याची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीची चौकशी करीत गोरेगावच्या भगतसिंहनगरमधून त्यांना अटक केली.