Join us

मनोरंजनासाठी थिएटर्सला पसंती!

By admin | Updated: May 9, 2015 03:40 IST

मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात रेसकोर्स, डिस्को, डान्स बार, व्हिडीओ गेम्स, केबल, आॅर्केस्ट्रा, डीटीएचसारखी मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत.

चेतन ननावरे, मुंबईमुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात रेसकोर्स, डिस्को, डान्स बार, व्हिडीओ गेम्स, केबल, आॅर्केस्ट्रा, डीटीएचसारखी मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र आजही मुंबईकरांची सर्वाधिक पसंती ही थिएटर्सला असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन कर विभागाने केलेल्या करवसुलीत सर्वाधिक म्हणजेच एकूण वसुलीच्या ४० टक्के इतकी वसुली ही थिएटर्समधून केलेली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात प्रशासनाने मुंबई शहरातून एकूण ९९ कोटी ७० लाख रुपयांची वसुली केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ९२ कोटींच्या घरात होता. त्यामुळे यंदा सात कोटींहून अधिक वसुली झाली.थिएटर्समधून प्रशासनाने मनोरंजन कराच्या स्वरूपात एकूण ४० कोटी ९१ लाख ३५ हजार रुपयांचा गल्ला जमवला आहे. शिवाय इतर मनोरंजनाच्या साधनांमधून शासनाने १७ कोटी ८१ लाख ४६ हजार रुपयांची वसुली केली आहे. दरम्यान, शासनाने एकूण १०५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र ठरवलेल्या उद्दिष्टाच्या ९४.९६ टक्के इतकी म्हणजेच ९९ कोटी ७० लाख रुपयांची वसुली करण्यात शासनाला यश आले. गेल्या वर्षी २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्रशासनाने ८९ कोटींचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ९२ कोटींचा महसूल गोळा केला होता. त्यामुळे निश्चित आकडेवारीच्या १०० टक्के वसुली झाली नसली, तरी गतवेळच्या तुलनेत अधिक महसूल गोळा झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.