Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षीय अनाया जैन हिच्या पुस्तकाचे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 15:20 IST

Anaya Jain : अनाया जैन हिने सांगितले की, पुढच्या पिढीला शिक्षित करण्यात मदत करणे, अशा अपंगत्वाबाबत मुलांमध्ये जागृती करणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. 

मुंबई - १५ वर्षीय अनाया जैन हिने चित्रित केलेल्या 'द अनलाइकली फ्रेंडशिपः अ बुक अबाऊट डाऊन सिंड्रोम' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री तारा शर्मा सलुजा यांच्या हस्ते नुकतेच थाटात झाले. टायटल वेव्हज, वांद्रे वेस्ट, मुंबई येथे हा प्रकाशन समारंभ पार पडला. पुस्तकाची संकल्पना आणि चित्रे अनाया जैन हिची आहेत.

हे पुस्तक 'पॅट्रिज इंडिया'ने प्रकाशित केले आहे आणि स्मृती राठी यांनी लिहिलेले आहे. त्यात डाऊन सिंड्रोम असलेल्या आर्यन नावाचा मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे. अनाया जैन हिने सांगितले की, पुढच्या पिढीला शिक्षित करण्यात मदत करणे, अशा अपंगत्वाबाबत मुलांमध्ये जागृती करणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. 

अनाया जैनचे पालक परीधी आणि चेतन जैन यांनी सांगितले की, आमच्यासाठी हा खरोखरच खूप मोठा क्षण आहे. अनायाच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला आशा आहे की, हे पुस्तक अनेकांना प्रेरणा देईल.या प्रकाशन सोहळ्याला उद्योगपती अनुपम मित्तल शैलेश लोढा, जय वकील फाउंडेशनच्या आकांक्षा केडिया, अनायाच्या शाळेचे मुख्याध्यापक, मित्रपरिवार आणि पुस्तकप्रेमी उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबई