Join us
Daily Top 2Weekly Top 5

पी(पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडे!गणेशोत्सवापूर्वी कार्यालय सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 16, 2023 20:32 IST

...परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे.

मुंबई-पी उत्तर विभाग कार्यालयाचे विभाजन करून मालाड पूर्वेच्या रामलीला मैदानातील कुंदनलाल सैगल नाट्य गृहाच्या इमारतीत पी (पूर्व) नवीन विभाग कार्यालय उभारण्यात आले आहे. पालक मंत्र्यांच्या हस्ते या नव्या विभाग कार्यालयाचे उदघाटन व्हावे असा हट्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी धरला आहे. परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे.

सामान्य जनतेला सुविधा मिळण्यासाठी पी (पूर्व) नवीन विभाग कार्यालय तत्काळ सुरू करावे यासाठी आपण गेली 15 दिवस पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.परंतू अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने गणेशोत्सवापूर्वी सदर कार्यालय सुरू करावे, अशी मागणी देखिल त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सामान्य दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.गणेशोत्सवाच्या विविध परवांग्यांसाठी मालाड पूर्व पिंपरी पाडा, आप्पा पाडा येथील गणेशोत्सव मंडळांना मालाड पश्चिम येथे जावे लागते ही खेदाची बाब असल्याची टिका त्यांनी केली.

मालाड पश्चिम आणि पूर्वेकडील नागरिकांना मालाड पश्चिम लिबर्टी येथे पी उत्तर हे एकच विभाग कार्यालय आहे.त्यामुळे मालाड पूर्वेकडील नागरिकांना या ठिकाणी कामकाजासाठी जायला खूप त्रास होतो.त्यामुळे पी उत्तर विभाग कार्यालयाचे विभाजन करून मालाड पूर्व भागात नवीन विभाग कार्यालयसुरू करा ही आपण मागणी महापौर असतांना आणि त्यानंतर गेली नऊ वर्षे विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून लावून धरली होती.त्यास नगरविकास कार्या लयाने मंजूरी दिली तसेच महापालिका स्तरावर बैठका देखिल झाल्या होत्या.तसेच हिवाळी अधिवेशनात मी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान तसेच नंतरच्या अधिवेशनात लक्षवेधी दरम्यान लवकरात लवकर नवीन विभाग कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन सरकार तर्फ़े मंत्रीमहोदयांनी दिले होते.त्यानंतर केलेल्या पाठपुराव्या नंतर मालाड पूर्वेच्या रामलीला मैदानातील कुंदनलाल सैगल नाट्य गृहाच्या इमारतीत नवीन विभाग कार्यालय उभारण्यात आले अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई