Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवा शूर सैनिकांसाठी बोरीवलीत राबवला अभिनव उपक्रम

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 13, 2023 16:22 IST

दिवाळीचा पहिला दिवा बळीराजा शेतकऱ्यांसाठी, देव देश आणि धर्मासाठी तरूणांची फौज उभी व्हावी यासाठी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. 

मुंबई - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे अनंतराव भोसले मैदानावर स्थानिक लहान मुलांना घेऊन सालाबादप्रमाणे वायंगणकर साई स्पोर्ट्स या संस्थेतर्फे पहिला दिवा शिवरायांसाठी, पहिला दिवा शूर सैनिकांसाठी संकल्पना राबवत बोरीवली येथे अभिनव उपक्रम  राबवला.

दिवाळीचा पहिला दिवा बळीराजा शेतकऱ्यांसाठी, देव देश आणि धर्मासाठी तरूणांची फौज उभी व्हावी यासाठी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात लहान मुलांना घेऊन शेणाने सारवलेल्या जमिनीवर फुलांची छानशी रांगोळी 'जय जवान जय किसान' या ब्रीद वाक्याने काढून पहिला दिवा लावण्यात आला. समाज सेवक गजानन राणे यांनी मुलांसोबत पर्यावरण आणि देव, देशा विषयी मार्गदर्शन केले.

टॅग्स :मुंबई