Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्यांनी कमी केले दप्तराचे ओझे

By admin | Updated: February 29, 2016 02:26 IST

इंडियन एज्युकेशन सोसायटी आयोजित ‘आर्यभट्ट विज्ञान प्रदर्शन’ नुकतेच संपन्न झाले. या प्रदर्शनात एक प्रयोग विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने ‘वजन घटवा

मुंबई : इंडियन एज्युकेशन सोसायटी आयोजित ‘आर्यभट्ट विज्ञान प्रदर्शन’ नुकतेच संपन्न झाले. या प्रदर्शनात एक प्रयोग विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने ‘वजन घटवा, ऊर्जा वाढवा’ या संकल्पनेवर आधारलेला होता. दोन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अदिती येडगे या विद्यार्थिनीने हा अभिनव प्रयोग सादर केला. आदितीला प्रयोग प्रभावीपणे समजावून सांगितल्याबद्दल बेस्ट स्पीकरचे पारितोषिकही देण्यात आले. प्रयोगाच्या संकल्पनेसाठी संतोष देटे आणि संजय सोनावणे या शिक्षकांना शाळेने विशेष पुरस्काराने गौरविले. पाचवी ते दहावीच्या मुलांचे दप्तराचे ओझे १२ ते १५ किलोपर्यंत असते. हे ओझे कमी व्हावे, म्हणून दोन किंवा अधिक विषयांच्या एका सत्रातील अभ्यासक्रमाचे एकच पुस्तक तयार करण्यात यावे. त्यामुळे दप्तराचे ओझे ३ किलोग्रॅमपर्यंत कमी होते. बीएआरसीचे डॉ. शरद काळे यांनी या शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या प्रयोगाचे कौतुक करीत, त्यांचे विशेष अभिनंदन केले. इतर शाळांनी यावर जरूर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)