Join us

थँक अ टीचर अभियान राबवून माना शिक्षकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये कोविडच्या संकटातही विद्यार्थ्यांना ...

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये कोविडच्या संकटातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळांमध्ये शिक्षक वर्ग अध्यापनाचे कार्य अव्याहतपणे करत आहे. या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. या शिक्षण दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षण विभागातर्फे शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविण्यात येणार आहे.

कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू करता आलेल्या नाहीत, तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करत शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने ०२ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत थँक अ टीचर अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.