ठाणे : बारवी धरणात आजघडीला ६७.५० इतका पाणीसाठा शिल्लक असून तो चार-पाच महिनेच पुरेल. त्यामुळे नियोजनासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करावी लागेल, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. याबाबत नियोजन करण्याच्या सूचना ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिव्याला आणखी ३ एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
ठाण्यात दोन दिवस पाणीकपातीची शक्यता
By admin | Updated: September 11, 2015 03:07 IST