Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: January 26, 2015 00:54 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास असणारी प्रमुख उपस्थिती आणि अतिरेक्यांकडून आलेल्या

ठाणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास असणारी प्रमुख उपस्थिती आणि अतिरेक्यांकडून आलेल्या धमकी या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांनी दिली. ठाणे आयुक्तालयातील सात हजार पोलीस आणि सहाशे अधिकारी या बंदोबस्तासाठी तैनात असून त्यासोबतच क्वीक रिस्पॉन्स टीमच्या (शीघ्र कृती दल) सात कंपन्या, एसआरपीच्या पाच कंपन्या, दंगल निर्मूलन पथकाच्या दोन कंपन्या आणि याशिवाय राखीव पोलीस तैनात आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट, कल्याण या पाचही परिमंडळात कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे. मॉल्स, स्टेशन्स,शाळा, कॉलेज, थिएटर्स, एस.टी.स्टँड या गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक खाजगी स्वरुपात तैनात आहेत. त्यांच्याही बैठका त्या-त्या झोनच्या पोलीस उपायुक्तांनी घेतल्या व त्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.