अजित मांडके ल्ल ठाणेबेस्ट सेलर कांदबरीकार सुदीप नगरकर यांच्या पायावर वीजेचा पोल पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे शहरातील जीर्ण झालेल्या हजारो पथदिव्यांच्या खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात आजमितीस ३३ हजार पथदिवे असून त्यातील ६ हजार पथदिव्यांचे रुपांतर एलईडी दिव्यात झाले आहे. परंतु, उर्वरित २७ हजार पथदिव्यांपैकी हजारो पथदिव्यांची अवस्था दयनीय आहे.पाचपाखाडी भागात आपल्या मित्राबरोबर गप्पा मारत असतांना नगरकर यांच्या पायावर हा पोल पडला. यावेळी पोलवर बॅनर लावण्यासाठी शिडी लावण्यात आली होती. परंतु तिचे वजन न पेलवल्याने तो खाली पडला. यावेळी जो बॅनर लावत होता, तोदेखील किरकोळ जखमी झाला़ मात्रा त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शहरातील ३३ हजार पोलचे आयुर्मान २० वर्षांचे आहे. दोन वर्षापूर्वी एलईडी दिवे बसविण्यास सुरवात झाली आणि आतापर्यंत सहा हजार दिवे बसविण्यात आले आहेत. त्यांना बसविण्यात येणारी डीपी ही आतील बाजूस असल्याने अपघात होण्याची अथवा वीजेची चोरी होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु जुन्या पोलवर डिपी बाहेर असल्याने अपघात आणि वीजचोरीचे प्रमाण झोपडपट्टी भागात अधिक आहे. वागळे, घोडबंदर, कळवा, गोकुळनगर, इंदिरा नगर, लोकमान्य नगर आदींसह इतर झोपडपट्टी भागात असलेल्या या पोलची अवस्था अतिशय दयनीय असून यावर केवळ पालिका पावसाळ्यापूर्वी रंगरंगोटी करते. काही पोल वाकलेल्या स्थितीत आहेत तर काही ठिकाणच्या पोलवरील दिवे हे कधीही खाली पडू शकतात.४दोन वर्षापूर्वी पोल दुरुस्ती व एलईडी दिव्यांसाठी १३ कोटी मिळाले होते. मागील वर्षी तीन ते पाच कोटींचाच निधी उपलब्ध झाला होता. ४दरवर्षी तीन ते चार हजार पोल बदलले जात आहेत. परंतु, सध्या पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने नव्या आर्थिक वर्षात या कामासाठी निधीच पडलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जीर्ण पोल बदलून नवीन टाकणार : या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी प्रभाग समितीनिहाय सर्वच पोलची पाहणी केली जाते़ आवश्यकतेनुसार ते बदलणे अथवा इतर दुरुस्तीची कामे केली जातात. त्यातही जे पोल जीर्ण झाले असतील ते बदलून त्या ठिकाणी नवीन पोल टाकले जातात.
ठाणे : पथदीपांचे हजारो खांब धोकादायक
By admin | Updated: January 22, 2015 22:55 IST