Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ठाणे काल, आज आणि उद्या’ची रुपरेखा

By admin | Updated: October 8, 2015 00:30 IST

लोकमतच्या काहीतरी कर ठाणेकर, या चळवळींतर्गत ठाणे काल, आज आणि उद्या या चर्चात्मक कार्यक्रमाचे ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सहयोग मंदिर येथे आयोजन केले आहे.

ठाणे : लोकमतच्या काहीतरी कर ठाणेकर, या चळवळींतर्गत ठाणे काल, आज आणि उद्या या चर्चात्मक कार्यक्रमाचे ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सहयोग मंदिर येथे आयोजन केले आहे. ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. निसर्गाने वेढलेले ठाणे ते मॉल संस्कृतीने बहरलेल्या ठाण्याचा प्रवास शहराने केला आहे. शहराचा हा बदलता चेहरा अनेक ठाणेकरांनी जवळून बघितला आहे. इतकेच नव्हे तर शहर अद्ययावत बनविण्यासाठी अनेकांचे हातभार या शहराला लाभले आहेत. यानिमित्ताने ठाणे काल, आज आणि उद्या कसे असावे, याचा एक परिसंवाद घडवून आणला जाणार आहे. यासाठी ठाण्याची ओळख असणारे किंबहुना शहराला नवीन चेहरा देणाऱ्या मान्यवरांना लोकमतच्या माध्यमातून आमंत्रित केले असून ठाणेकरांनी या परिसंवादाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८६५२२००२२६ किंवा ९८७०९१२२३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.सहभागी मान्यवरसंपदा जोगळेकर-कुलकर्णी - अभिनेत्रीरवींद्र प्रभुदेसाई - पितांबरीविजू माने - दिग्दर्शकसुदीप नगरकर - लेखकरोहितभाई शहा - टिपटॉपमुकुंद नातू - बिल्डररविराज अहिरराव - वास्तुशास्त्रज्ञमुलाखतकार अभिनेता - विघ्नेश जोशी