Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज

By admin | Updated: August 22, 2015 22:47 IST

२६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. रविवारी सकाळी ६.३० वा. मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय

ठाणे : २६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. रविवारी सकाळी ६.३० वा. मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक ठाण्यात दाखल झाले असून सुमारे २५ हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. या स्पर्धेत या वेळी प्रथमच सर्व घटकांतील मंडळे, ज्ञातीबांधव, सेवाभावी संस्था, विविध क्र ीडा क्षेत्रांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेचे उपवाणिज्य दूत एलियस गेट यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच यंदा मुख्य स्पर्धेतील खेळाडूंना टायमिंग चीप देण्यात येणार असल्यामुळे स्पर्धेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. निर्धाराने धावू या, ठाणे स्वच्छ व हिरवेगार करू या, असा संदेश देत स्पर्धक धावणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे व सिनेकलावंत यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तसेच महाराष्ट्र हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे आदिल सुमारीवाला यांची विशेष उपस्थिती असणार आहे. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा मार्गावर ठाणे शहरातील कलावंत उपस्थित राहणार आहेत.२१ किमी, १५ किमी व १८ वर्षांखालील, १५, १२, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक, रन फॉर फन अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. २१ किमी व १५ किमी या मुख्य स्पर्धा सकाळी ६.३० वा. सुरू होणार असून इतर स्पर्धांची सुरु वात सकाळी ८.३० वा. सुरू होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ११ वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)