Join us

ठाणो महापालिके ला पर्यावरण पुरस्कार

By admin | Updated: November 23, 2014 01:21 IST

शहरात पर्यावरण नियंत्रणाकरिता राबविलेल्या विविध उपक्रमांची इंडिया टुडे संस्थेने दखल घेतली आहे.

ठाणो : शहरात पर्यावरण नियंत्रणाकरिता राबविलेल्या विविध उपक्रमांची इंडिया टुडे संस्थेने दखल घेतली आहे. उत्कृष्ट पर्यावरणीय शहर पुरस्कारासाठी ठाणो शहराची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या समारंभात ठाण्याचे महापौर संजय मोरे व महापालिका अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी तुरा रोवला गेला आहे.
या संस्थेने संपूर्ण भारतात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून ठाणो महापालिकेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ठाणो महापालिका ही स्वत:चा प्रदूषण नियंत्रण कक्ष असणारी  पहिली महानगरपालिका आहे. प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या तीन प्रयोगशाळांच्या माध्यमातून हवा व पाण्याची नियमित तपासणी केली जाते. 24 तास हवा सर्वेक्षणाकरिता तीन मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. शहरातील एकूण क्षेत्रफळापैकी 52 टक्के क्षेत्रफळ हरित आहे. ठाणो महापालिका स्वत:च्या ‘व्हेदर मॉनिटरिंग स्टेशन’द्वारे वर्षभर तापमान व पर्जन्यमान मोजते आणि सर्वेक्षण करते. ‘हर बार इको त्योहार’च्या माध्यमातून पर्यावरणीय उत्सव साजरे करण्यात येणार आहेत व जनजागृतीही केली जाणार आहे. ठाणो शहरात कृत्रिम तलावांमध्ये मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याचप्रमाणो हरित जनपथ योजनाही माध्यमातून राबविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)