Join us

ठाण्यात आज वीज नाही

By admin | Updated: June 12, 2015 03:33 IST

महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील काही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

ठाणे : महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील काही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत फ्लॉवर व्हॅली, गोल्डन पार्क, चिरागनगर, हरिराम संतराम, माजिवडा गाव, सेट डेव्हलपर, केटीको, ओसवाल पार्क, ऋतू पार्क, वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट, सद्गुरू सोसायटी, कोलबाड, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी आणि राबोडी या परिसरांचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.