ठाणे: विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आता ठाणे महापालिकेच्या शिक्षकांना पुन्हा नवी मुंबई, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे काम लागले आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने आता शिक्षकांना निवडणूक आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा याची कामे या एकाच वेळी करावी लागणार असल्याने त्यांची तारेवरची कसरत होणार आहे. दुसरीकडे खाजगी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना पालिका शाळेतील शिक्षक मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा होत्या. त्या काळात शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आले होते. आता वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या असताना शिक्षकांना पुन्हा अशाच प्रकारे नवी मुंबई महापालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीचे काम करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
ठामपा शिक्षकांना निवडणुकीचे काम
By admin | Updated: April 3, 2015 22:39 IST