Join us

तलासरी: स्त्री उमेदवाराला मारहाण

By admin | Updated: January 25, 2015 22:59 IST

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तलासरीत चौरंगी लढत होणार असल्याने प्रचाराचा धुरळा उडाला

तलासरी : जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तलासरीत चौरंगी लढत होणार असल्याने प्रचाराचा धुरळा उडाला असताना रविवारी त्याला मारहाणीचे गालबोट लागून तलासरीत निवडणूक हिंसाचाराचा पहिला गुन्हा दाखल झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संभा गटातील महिला उमेदवार नयना विक्या पागी या आपल्या कार्यकर्त्यांसोबत झरी तांबडपाडा येथे पायी प्रचार करीत असताना झरी गावातील भाजपाच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला भाजपाच्या कृत्याने काळा डाग लागला.(वार्ताहर)