Join us  

मध्य रेल्वेच्या कामकाजावर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:18 AM

रेल्वे बोर्ड : रेल्वेचा वक्तशीरपणा केवळ ५४ टक्के

मुंबई : सर्वसामान्यांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या रेल्वेच्या लेटमार्कची दखल घेत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी देशातील सर्वाधिक वाईट कामगिरी करणाºया १० विभागांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यात मध्य रेल्वे विभागाचाही समावेश होता.रेल्वे बोर्डातर्फे देशातील सर्व विभागीय रेल्वेंच्या वेळेबाबत पाहणी केली. यानुसार मध्य रेल्वेवरील रेल्वे उशिराने धावत असल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील ट्रेनचा या पाहणीत समावेश होता. मध्य रेल्वेच्या केवळ ५४ टक्के रेल्वे या वक्तशीरपणे धावत असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले. रेल्वेच्या विलंबाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाºयांना खडे बोल सुनावताना अध्यक्ष अश्वनी लोहाणी म्हणाले की, प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे.मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, स्थानकातील फाटकांमुळे रेल्वेला विलंब होतो. दिवा, ठाकुर्ली, आंबवली, कल्याण स्थानकांत फाटक आहे. या फाटकांवर पूल बनविण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वे व संबंधित महापालिका यांनी संयुक्तरीत्या हे काम करायचे आहे. रेल्वेने काम पूर्ण केले असून, संबंधित महापालिका क्षेत्रातील कामे अपूर्ण आहेत.पश्चिम रेल्वे ‘टॉप टेन’मध्येरेल्वे बोर्डाच्या विभागीय रेल्वेच्या वक्तशीरपणा, या पाहणीमध्ये पश्चिम रेल्वे विभागाचा समावेश ‘टॉप टेन’ यादीत करण्यात आला असून, पश्चिम रेल्वे दहाव्या स्थानी आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांतून सुटणाºया बहुतांशी रेल्वे या वक्तशीरपणे धावत आहेत. बोर्डाच्या पाहणीमध्ये पश्चिम रेल्वेतील ९१ टक्के रेल्वे या वक्तशीरपणे धावत आहेत.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे