Join us

हातगाडीवर मिळतोय बनावट बासमती

By admin | Updated: May 6, 2015 23:41 IST

ठाण्यात वर्तकनगर, शिवाजीनगर, किसननगर, चंदनवाडी आदी परिसरांत केमिकल्सचा वापर करून बनावट बासमती तांदूळ हातगाडीवर विकला जात आहे.

केमिकल्सचा होतोय वापर : ५० रु पये किलो दरामुळे ग्राहक भुललेघोडबंदर : ठाण्यात वर्तकनगर, शिवाजीनगर, किसननगर, चंदनवाडी आदी परिसरांत केमिकल्सचा वापर करून बनावट बासमती तांदूळ हातगाडीवर विकला जात आहे. या केमिकलमिश्रित तांदळामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हातगाडीवर फक्त ५० रु पये किलो दराने मिळणाऱ्या या तांदळावर गृहिणींची झुंबड उडत आहे.हा तांदूळ कृत्रिमरीत्या सुवासिक बनवून विकला जात आहे. बाजारात खरा बासमती ८० ते २०० रु पये दराने उपलब्ध असताना रस्त्यावर ५० रु पये दराने मिळणारा हा तांदूळ अनेकांना भुलवित आहे. किरकोळ विक्रीसाठी किंवा होलसेल दराने खाद्यवस्तू विकण्यासाठी अन्न परवाना घेणे आवश्यक असते. यासाठी अन्न व औषध विभागाकडून १०० रु पये भरल्यावर वार्षिक परवाना दिला जातो. मात्र, विनापरवाना ठाण्यात रस्त्यावर अशी किरकोळ विक्रीची दुकाने हातगाडीवर थाटली जात आहेत. हातगाड्यांवर खोबरे, मसाल्याचे पदार्थ, हळद, मिरची, खारीक, बटर, बासमती तांदूळ यांची विक्री होत आहे. (वार्ताहर)हा तर ‘लाकडा बासमती’हे फेरीवाले खटक्याचा वजनकाटा वापरून मापातदेखील फसवणूक करतात. व्यापारी भाषेत लाकडा बासमती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांब तांदळाला केमिकलचा कृत्रिम स्वाद दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी तो हुंगल्यास चांगल्या प्रतीचा बासमती असल्याचे जाणवते. ----------किरकोळ विक्री करणाऱ्यांनी अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आमच्या अन्न निरीक्षकांना जागेवर पाहणीसाठी पाठवून असे फेरीवाले दिसल्यास कारवाई निश्चित करू. - प्रदीप राऊत, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन