Join us  

टेक्सटाईल म्युझियमबरोबर गिरणी कामगारांना घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 2:08 AM

मुंबईचे तत्कालिन वैभव असलेल्या गिरणगावचा सुवर्णकाळ, गिरणी कामगारांचा इतिहास,

मुंबई : भायखळ्यात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या टेक्सटाईल म्युझियमबरोबर त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. पालिका प्रशासनानेही यास अनुकूलता दर्शविल्यामुळे गिरणी कामगारांनाही येथे घरे उपलब्ध होणार आहेत.

मुंबईचे तत्कालिन वैभव असलेल्या गिरणगावचा सुवर्णकाळ, गिरणी कामगारांचा इतिहास, त्यांचे सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडिवणारे टेक्सटाइल म्युझियम महापालिका उभारणार आहे. गेले काही वर्षे हा प्रस्ताव अनेक कारणांमुळे रखडला होता. अखेर या म्युझियमच्या कामाला सुरूवात होत असताना गिरणगावाच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या गिरणी कामगारांसाठीही घर बांधण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यासाठी म्युझियमकरिता प्रस्तावित जागेची पाहणी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सार्वजनिक बांधकाम-आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी गिरणी कामगारांसाठी घरं बांधण्याचा आपला मानस व्यक्त केला.गिरणी कामगारांच्या मुलांना नोकऱ्यांची संधीगिरणी कामगारांसाठी घरे बांधल्यास परिसरात असणाºया उद्योगधंद्यांमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना नोकºया मिळतील. यासाठी कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी संबंधितांसोबत लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.च् भायखळ्यात दि इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ च्या जागेवर रिक्रिएशन ग्राऊंड- कम टेक्साईल म्युझियम उभे राहणार आहे. कापड उद्योग ग्राम या संकल्पनेवर दहा एकर जागेवर काम होणार आहे.च्मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळामार्फत महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेवर महापालिकेच्या वतीने टेक्सटाइल म्युझियम उभारणार आहे.च्मिलमधील संरक्षित तळे व त्या लगतचा परिसराचे सुशोभिकरण, प्रकाश व ध्वनी माध्यमातून गिरणीचा इतिहास व गिरणी कामगारांचे सामाजिक योगदान व सांस्कृतिक पैलू यांचे सादरीकरण या म्युझियममध्ये केले जाणार आहे. विद्यमान वास्तूमध्ये टेक्साईल म्युझियम, वाचनालय, सभागृह, कलाप्रदर्शन, पब्लिक प्लाझा आदी बाबींकरीता अंतर्गत बदल करून या पुरातन वास्तूंचे संवर्धन आणि पुनर्वापर करण्यात येईल.च् या प्रकल्पाचा खर्च तीनशे कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात पालिकेने २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टॅग्स :मुंबईघर