Join us

टीईटी परीक्षा आता ३१ ऑक्टोबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परिषदेने टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून आता ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

राज्यात येत्या १० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा असल्याने टीईटी परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र १४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

वेळापत्रक

परीक्षा - दिनांक व वेळ

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – १ - ३१ ऑक्टोबर २०२१, स. १०. ३० ते १३ . ००

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – २- ३१ ऑक्टोबर २०२१, दु. १४.०० ते १६. ३०