Join us

मृत्युपत्र अडवाणींना तूर्त मिळणार नाही

By admin | Updated: August 5, 2014 03:25 IST

दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचे मृत्युपत्र व ते प्रमाणित करण्यासाठी न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे अनिता अडवाणी यांना द्यावीत,

मुंबई : दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचे मृत्युपत्र व ते प्रमाणित करण्यासाठी न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे अनिता अडवाणी यांना द्यावीत, हे न्या़ आऱ डी़ धानुका यांचे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या़ एम़एस़ सोनक यांच्या खंडपीठाने सोमवारी स्थगित केल़े
याप्रकरणी अभिनेत्री टि¦ंकल खन्ना हिने अपील याचिका दाखल केली आह़े ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेताना खंडपीठाने वरील स्थगिती दिली़ तसेच या याचिकेवर अंतिम निर्णय होईर्पयत ही स्थगिती राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केल़े त्यामुळे तूर्तास तरी अडवाणी यांना खन्ना यांचे मृत्युपत्र मिळणार नाही़
खन्ना यांचे मृत्युपत्र प्रमाणित करण्यासाठी अभिनेत्री टि¦ंकल खन्ना हिने न्यायालयात प्रोबेट दाखल केले आह़े मात्र, हे मृत्युपत्र बनावट असून खन्ना यांच्या मालमत्तेत आपल्यालाही वाटा मिळायला हवा़ तेव्हा हे मृत्युपत्र तपासण्यासाठी त्याची प्रत देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अडवाणी यांनी दाखल केली होती़ दरम्यान, खन्ना यांच्या मालमत्तेवर अडवाणी दावा करू शकत नाहीत़ 
तेव्हा त्यांच्या मृत्युपत्रची प्रत त्यांना देता येणार नाही, असा युक्तिवाद अभिनेत्री टि¦ंकलच्या वतीने करण्यात आला़ अखेर, न्या़ धानुका यांनी मृत्युपत्रची प्रत अडवाणी यांना देण्याचे आदेश टि¦ंकल यांना दिल़े याविरोधात टि¦ंकलने मुख्य न्यायाधीश शहा यांच्या खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली़   (प्रतिनिधी)