Join us
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी चाचणी

By admin | Updated: June 7, 2015 00:33 IST

भारतात रंगणाऱ्या आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी निवड चाचणी शिबीर चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर ९ ते ११ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई : भारतात रंगणाऱ्या आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी निवड चाचणी शिबीर चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर ९ ते ११ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. पश्चिम भारत फुटबॉल संघटनेच्या (विफा) वतीने होणाऱ्या हे शिबीर आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (एआयएफएफ) निदर्शनाखाली पार पडेल.हे शिबीर सध्या मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी खुले असून २००० साली जन्मलेले खेळाडू या शिबीरामध्ये सहभाग घेऊ शकतील. त्याचबरोबर उर्वरीत महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी देखील निवड चाचणी शिबीर घेण्यात येणार असून त्याबाबतीत लवकरच ‘विफा’मार्फत माहिती देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले. हे शिबीर दररोज सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत सुरु असेल.अर्ज उपलब्ध आहेतया शिबीरात सहभागी होण्यासाठी ‘विफा’च्या ६६६.६्रां.्रल्ल या संकेतस्थाळावर अर्ज उपलब्ध असून नोंदणी करताना खेळाडूंनी वयाच्या दाखल्यासाठी पासपोर्ट किंवा जन्मदाखला या कागदपत्रांची मूळ प्रत सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.तीन दिवस रंगणारे हे शिबीर दररोज सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरु असेल.