Join us  

वैद्यकीय कर्मचा-यांवर हल्ले करणारे दहशतवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:15 PM

रुग्णालयांतील सुरक्षा आणि प्रभावी उपचारांसाठी आॅनलाईन पिटीशन

मुबई - वैद्यकीय कर्मचा-यांवर हल्ले करणा-यांना दहशतवाद्यांप्रमाणे शिक्षा करा, कोरोना रुग्णांची हेळसांड होत असून त्यांच्यावर सुरक्षित पध्दतीने आणि योग्य प्रकारे उपचार करा, वेगवेगळे किटक तसेच प्राणी, पक्षांचे मांस विकणा-या चीनच्या बाजारावर कायमची बंदी घाला अशा असंख्य मागण्या पुढे रेटणा-या आॅनलाईन पिटीशन्सची संख्य गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढू लागली आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची होणारी हेळसांड, आपला जीव धोक्यात टाकून कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचा-यांवरील हल्ले, त्यांना आवश्यक असलेल्या सुरक्षा उपकरणांचा आभाव हे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. कुठे परिचारीकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. तर, कुठे डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढवावा लागतोय. वैद्यकीय कर्मचा-यांच्या पीपीई किटचा तुटवडा भारतातच नाही तर जगभरात चिंतेचा विषय झाला आहे. हे सारे मुद्दे आॅनलाईन याचिकांमध्ये दिसतात. जास्तीत जास्त लोकांना आॅनलाईन पध्दतीने सहभागी करून घेत मागण्यांच्या पुर्ततेसाठी दबाव निर्माण करणे हा या याचिकांचा उद्देश असतो.

ठाण्यातील एका कोरोना रुग्णाला उपचारादरम्यान दाहक अनुभव आल्यानंतर त्यांच्या पत्नीने सुरक्षित पध्दतीने आणि विलगिकरणातील उपचारांसाठी अशीच दाखल केली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याचे गुन्हे अजामिनपात्र करावे आणि त्यांना दहशतवादी समजून शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी करणा-या दोन स्वतंत्र याचिका आहेत. त्यांना गेल्या दोन तीन दिवसांत त्यांना अनुक्रमे १ लाख ५६ हजार आणि २ लाख २४ हजार जणांनी पाठिंबा दर्शविला आहे. कोव्हीड १९ चा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय कर्मचा-यांना भक्कम सुरक्षा हवी या आशयाच्या तीन याचिका आहेत. तर, पीपीई किटची मागणी करणारी स्वतंत्र याचिका आहे. भारतातील करोना चाचण्यांची संख्या वाढवा, जेष्ठांच्या चाचण्या विनामुल्य पध्दतीने करा, प्रत्येक संशयीत व्यक्तीच्या चाचण्या विनामुल्य करा, आपापल्या गावी परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना पुरेसे अन्न आणि सुरक्षित निवारा द्या. तसेच, त्यांना आपापल्या घरी पोहचविण्याची व्यवस्था निर्माण करा, भाडे तत्वावरील घरांमध्ये राहणा-यांचे एक महिन्याचे भाडे मालकांनी रद्द करावे अशा अनेक याचिका दाखल आहेत.----डब्ल्यूएचओच्या संचालकांता राजीनामा घ्यादेशभरातल्या कोरोनाच्या प्रकोपाला चीनला जबाबदार ठरवून जागतीक आरोग्य संघटनेच्या संचालकांचा राजीनामा घ्या अशी मागणी करणारी याचिकासुध्दा दाखल आहे. चीनच्या मांस बाजारावर बंदी घालण्याची मागणी करणा-या दोन याचिका असून त्यापैकी एका याचिकेत या मार्केटचा उल्लेख वळवळणारा बॉम्ब असा करण्यात आला आहे.  

 

टॅग्स :हॉस्पिटलकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस