Join us

दहिसर येथून दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:09 IST

मुंबई : दहिसर पूर्व येथील बाभळीपाडा येथे सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून नागरिकांना धमकाविणाऱ्या एका सराईत ...

मुंबई : दहिसर पूर्व येथील बाभळीपाडा येथे सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून नागरिकांना धमकाविणाऱ्या एका सराईत गुंडाला पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोहित आकाश भोजराज (३३) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील जिवंत काडतूस व गावठी कट्टा जप्त केला.

गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट-१२ च्या पथकातील उपनिरीक्षक हेमंत गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. मोहित भोजराज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दहिसर व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यांत हत्येचा प्रयत्न, मारामारी, दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री तो दहिसर (पूर्व) येथील पूर्व-पश्चिम जोड पुलाच्या खाली हातात गावठी कट्टा घेऊन परिसरातील नागरिकांना धमकावीत होता, त्यामुळे त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्याबाबत गीते यांना माहिती मिळाल्यानंतर सहकाऱ्यासह त्या ठिकाणी धाव घेतली. मोहित आकाश भोजराजला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला.