Join us

मुंबईत बहरणार टेरेस गार्डन्स

By admin | Updated: March 12, 2016 02:45 IST

एकीकडे मुंबईतील सर्वांत मोठा हरितपट्टा असलेली आरे कॉलनी विकासासाठी खुली करण्याचे प्रस्तावित असताना इमारतींच्या गच्चीवर उद्यान ही संकल्पना आणण्याच्या तयारीत महापालिका आहे़

मुंबई : एकीकडे मुंबईतील सर्वांत मोठा हरितपट्टा असलेली आरे कॉलनी विकासासाठी खुली करण्याचे प्रस्तावित असताना इमारतींच्या गच्चीवर उद्यान ही संकल्पना आणण्याच्या तयारीत महापालिका आहे़ विकास नियंत्रण नियमावलीत टेरेस गार्डनसाठी तरतूद करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे़परदेशात इमारतींच्या गच्चीवर मोठ्या वृक्षांसह उद्यान तयार करण्याची पद्धत सुरू झाली आहे़ चेन्नईमध्ये घरांच्या गच्चीवर भाजीपाला उगवल्यास त्यासाठी लागणाऱ्या बियाण्याला सरकारकडून निम्मे अनुदान दिले जात होते़ ही संकल्पना मुंबईतही राबविण्याची मागणी २००७ मध्ये तत्कालीन महापौर डॉ़ शुभा राऊळ यांनी केली होती़गच्चीवर, बहुमजली इमारतींमध्ये असलेल्या मोकळ्या मजल्यांवर अशा प्रकारचे उद्यान उभारण्याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे केली होती़ हा प्रस्ताव आज समितीच्या बैठकीपुढे चर्चेसाठी आला असता सर्वपक्षीय सदस्यांनी यास समर्थन दिले़ त्यामुळे पालिका आयुक्तांनीही याची दखल घेऊन उद्यान उभारण्यासाठी तांत्रिक व शास्त्रीय अभ्यास करण्याची तयारी दाखविली़ (प्रतिनिधी)