Join us

स्मार्ट बीकेसी प्रकल्पासाठी निविदा मागविल्या

By admin | Updated: July 17, 2015 00:50 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. स्मार्ट बीकेसी प्रकल्पाचा आराखडा,

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. स्मार्ट बीकेसी प्रकल्पाचा आराखडा, विकास, प्रकल्पाची अंमलबजावणी, त्याचा वापर आणि देखभाल यासाठी निविदा मागविण्यात आली असून, वर्षभरात प्रकल्प उभारणीस सुरुवात करण्यात येणार आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनेक उपकंपन्या काम करतील आणि निविदा मिळणाऱ्या कंपनीला त्यांच्याशी समन्वय साधून एकात्मिकदृष्ट्या काम करून प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट पार्किंग सुविधा, स्मार्ट पथदिवे, व्हिडीओ अ‍ॅनॅलिटीक्स आणि सर्वेक्षण तसेच नागरी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुविधा असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे ९.४१ कोटी रुपये इतका असेल. तसेच पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत हा प्रकल्प उभा राहील अशी आमची अपेक्षा आहे, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी सांगितले.मुंबई महानगरातील अनेक महत्त्वाची ठिकाणे, जंक्शनची ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरा सर्वेक्षणाखाली आणण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनुषंगाने या प्रकल्पासाठी काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे, असे सेठी यांनी सांगितले.