Join us

‘मोनो’च्या ताफ्यात आणखी दहा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:06 IST

एमएमआरडीए; आठवडाभरात काढणार निविदा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल्वेच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचे ठरविले आहे. या मोनोच्या स्थानकांवर मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी, यासाठी आणखी दहा मोनो विकत घेण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणाने घेतला आहे. यासाठी येत्या आठवडाभरामध्ये निविदाही काढण्यात येणार आहेत.मोनोरेल्वेच्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसºया टप्प्यावर मोनोरेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यासाठी एमएमआरडीएआणखी दहा मोनो विकत घेण्यासाठी निविदा काढणार आहे. सध्या या मार्गावर चार मोनो धावत आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाºयांना २० ते २५ मिनिटे मोनोची वाट पाहावी लागत आहे. मोनोच्या ताफ्यात आणखी दहा मोनो आल्यास, या फेºयांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांना जास्त काळ मोनोची वाट पाहावी लागणार नाही.दरम्यान, बंद असलेल्या तीन मोनो रेल्वेंची जुनी सामग्री वापरून दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे येत्या तीन महिन्यांत या मोनोही मोनोरेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. यामुळे या मार्गावर एकूण सात मोनो धावतील. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने, मोनोसाठी प्राधिकरणाला निविदा काढता येत नव्हत्या. आता २३ मे ला निवडणुकीच्या निकालानंतर ही निविदा प्रक्रिया प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणार आहे.च् मोनोरेल्वेच्या मार्गावर सध्या केवळ चार गाड्या धावतच्यामुळे एक गाडी गेल्यानंतर या मार्गावर प्रवास करणाºयांना २० ते २५ मिनिटे मोनोची वाट पाहावी लागते.च्प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, त्यांच्या वेळेची बचत व्हावी तसेच जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवासासाठी मोनोचा पर्याय निवडावा यासाठीच नव्या दहा गाड्या घेण्याचे एमएमआरडीएचे प्रयोजन आहे.

टॅग्स :मोनो रेल्वे