Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख चोरणारा सुरक्षारक्षक गजाआड

By admin | Updated: October 30, 2014 01:54 IST

रुग्णालयातील लॉकरमधून 1क् लाखांची रोख रक्कम लंपास करणा:या सुरक्षारक्षकास भोईवाडा पोलिसांनी अटक केली.

मुंबई : रुग्णालयातील लॉकरमधून 1क् लाखांची रोख रक्कम लंपास करणा:या सुरक्षारक्षकास भोईवाडा पोलिसांनी अटक केली. गणोश पालेकर असे संशयित आरोपीचे नाव असून, तो कुर्ला येथे राहणारा आहे. 
परळमधील ग्लोबल रुग्णालयात 24 ऑक्टोबरला ही घटना घडली. रुग्णालयाच्या कार्यालयामधील सर्व कर्मचारी काम आटोपून सायंकाळी घरी गेले. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षारक्षकांचे काम करणा:या पालेकरची येथे डय़ुटी होती. रुग्णालयातील सर्व बाबी त्याला माहीत असल्याने 24 तारखेला त्याने रुग्णालयातील कपाटामधून लॉकरच्या चाव्या काढल्या. त्यानंतर लॉकरमधून 9 लाख 77 हजारांची रक्कम घेऊन पुन्हा लॉकर आणि कपाट व्यवस्थित बंद केले. दुस:या दिवशी कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांनी लॉकर उघडले असता लॉकरमधील रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. त्यानुसार पहिल्यांदा पोलिसांनी सर्व कर्मचा:यांची कसून चौकशी केली. मात्र काहीही माहिती मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तो लॉकर परिसरात दिसला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात 
घेऊन त्याची कसून चौकशी 
केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)