Join us

दस:याच्या भेटीगाठींमध्ये ‘मरे’चे विघ्न!

By admin | Updated: October 4, 2014 02:47 IST

दस:याची खरेदी, मित्र तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींमध्ये शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेने विघ्न आणले.

सेवा विस्कळीत : कुल्र्याला पेन्टोग्राफ तर मांटुग्याजवळ ओव्हरहेड वायर तुटली
मुंबई : दस:याची खरेदी, मित्र तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींमध्ये शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेने विघ्न आणले. कुर्ला आणि सायन व माटुंगा अशा दोन ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटल्याने विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यास बाहेर पडलेल्यांना चांगलाच फटका बसला. मध्य रेल्वे तब्बल दीड ते दोन तास विस्कळीत होती. 
दुपारी 2 वाजता अंबरनाथच्या दिशेने जाणा:या धीम्या लोकलचा पेन्टोग्राफ कुर्ला स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर येताच तुटला. त्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा भायखळा ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. अंबरनाथच्या दिशेने जाणा:या धीम्या आणि जलद लोकल 15 मिनिटे उशिराने धावू लागल्या. गाडय़ांना प्रचंड गर्दी झाली आणि सकाळी दस:याची खरेदी करून दुपारच्या सुमारास घरी परतणा:यांना चांगलाच फटका बसला. पेन्टोग्राफच्या दुरुस्तीचे काम दुपारी साडेतीन वाजता संपल्यावर डाऊन धीमा मार्ग पूर्ववत झाला. मात्र सायन ते माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर ओव्हरहेड वायरही तुटली व हा मार्गही विस्कळीत झाला. सीएसटीकडे जाणा:या धीम्या लोकलच्या घाटकोपर ते दादर्पयत रांगाच लागल्या होत्या. हा मार्गही साडेतीनच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. मात्र अप धीम्या मार्गावरील लोकलही उशिराने धावत होत्या.
 
डोंबिवली स्थानकात मंगळवारी लोकलचा डबा घसरल्याची घटना ताजी असतानाच आज दस:याच्या दिवशी सीएसटीकडे निघालेल्या लोकलचा सातवा डबा कल्याण स्थानकात संध्याकाळी घसरला. फलाट क्रमांक 1 वर ही घटना घडल्याने लोकलचा खोळंबा झाला नसला तरीही वेळापत्रक मात्र सपशेल कोलमडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.