मुंबई : नवीन वस्तू, वाहन, सोन्या-चांदीचे दागिने खरेदीचा मुहूर्त म्हणजे दसरा. दसरा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने शहर -उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली, ङोंडूच्या फुलांची किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी ङोंडूची फुले आणखी महागण्याची शक्यता आहे.
महागाई वाढली असली तरी जनसामान्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येते आहे. फुलमार्केट ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते, तर सराफांच्या दुकानांतही लोकांनी दाटी केली होती. एकीकडे सराफा बाजारात सोने खरेदीसाठी झालेली गर्दी व दुसरीकडे फुला-पानांची खरेदी अशा वातावरणात सगळीकडेच धामधूम सुरू आहे. या सणाला अबालवृद्धांपासून नवीन कपडे खरेदी, सोने, वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणा:या दस:याला हिंदू पुराणात विशेष महत्त्व आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजयाचे तोरण बांधले होते. पांडवांनी वनवास संपल्यानंतर शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली होती. त्यामुळे विजयोत्सवाचे प्रतीक असणारा हा दिवस आपापल्यापरीने साजरा करणा:यांनी फुलांची, कपडय़ांची, मिठाईची, सोन्याची व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
लोकलमध्ये लक्ष्मीपूजन
विजयादशमीनिमित्त लोकल डब्यात पूजन केले जाते. ङोंडूच्या माळा, आंब्याची पाने, भाताचे लोंबे व कागदी पताकांनी गाडीचे डबेही सजवले जातात. डब्यांमध्ये नेहमी प्रवास करणारे प्रवासी लक्ष्मी, सरस्वती, अंबाबाई, गणपती यांचे फोटो लावून आरती करतात. तसेच पेढे व मिठाई वाटून दस:याच्या शुभेच्छाही देतात. महिलांच्या डब्यात पारंपरिक गाणी, भेंडय़ा, भोंडल्याची गाणी म्हटली जातात. याचीच पूर्वतयारीस वेग आला असून दोन दिवसांपूर्वीच लोकल डब्यांत पताकेही लावले आहेत.