Join us

दहा लाखांची डहाणूत घरफोडी

By admin | Updated: September 11, 2014 00:21 IST

याबाबतीत डहाणू पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डहाणू : शहरातील रामवाडी येथील एका बंद असलेल्या फ्लॅटच्या खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून काही चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोने, चांदी तसेच अडीच लाख रोख असा एकूण १० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतीत डहाणू पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डहाणू येथील ठाण्याच्या हद्दीतील रामवाडी तन्ना कम्पाउंड येथे रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या फ्लॅटचे लोखंडी ग्रील वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर, चोरांनी तेथे असलेले कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या काही मौल्यवान वस्तूंबरोबर कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये रोख असा एकूण १० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. घरमालक कुशल पांचाळ (रामवाडी) यांनी डहाणू पोलीस ठाण्यात घरफोडी झाल्याची तक्रार केली आहे.