Join us  

राज्यात पारा बत्तिशीपार, मुंबईतही वाढला उकाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 5:38 AM

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर येथे ३६.६ तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर येथे ३६.६ तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यासह मुंबईतही उकाडा वाढला आहे. ३ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ४ आणि ५ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १८ अंशांच्या आसपास राहील.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :तापमान