Join us

मुंबई तापली, तापमान ३७.५; देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत

By सचिन लुंगसे | Updated: February 26, 2024 19:31 IST

सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.

मुंबई : पूर्वेकडून वाहणा-या वा-यासह आर्द्रता कमी झाल्याने मुंबईच्या वातावरणात अचानक बदल होत आहेत. मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. याच बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.मुंबईत पुढील ३ दिवस कमाल तापमान ३५ ते ३७ अंश एवढे नोंदविण्यात येईल. त्यानंतरचे ३ दिवस मुंबईच्या कमाल तापमानात ५ अंशाची घट होईल. या काळात कमाल तापमान ३२ अंशाच्या आसपास असेल. तर किमान तापमान ३ ते ४ अंशांनी कमी होईल. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असली तरी थंडीचा हंगाम अद्याप संपलेला नाही. पूर्वेकडून वारे वाहत आहेत. शिवाय आर्द्रता कमी नोंदविण्यात येत आहेत. त्यामुळे हवामानात बदल होत आहेत.राज्यातील शहरांचे कमाल तापमान

मुंबई ३७.५सोलापूर ३५.८जळगाव ३५.२सांगली ३४.७कोल्हापूर ३४.६सातारा ३४.६नाशिक ३४.३अहमदनगर ३४.२परभणी ३४

टॅग्स :तापमानमुंबई