Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:07 IST

तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्जतेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्जकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्क...

तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्ज

तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्ज

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी बुधवारी अर्ज केला.

तेलतुंबडे यांनी देशाविरुद्ध युद्ध छेडले, युद्ध छेडण्याचा प्रयत्न केला, देशाविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी इतरांना प्रोत्साहित केले, असे आरोप एनआयएने केले आहेत.

तेलतुंबडे यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चाळीस वर्षे काम केले. या कंपनीत ते कार्यकारी संचालक आणि नंतर सहा वर्षांसाठी व्यवस्थापक संचालक हाेते. गरीब कुटुंबातील असून केवळ स्वतःची बुद्धी व मेहनतीच्या बळावर ते एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले. ते जगात दलित साहित्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, जातीभेद करणाऱ्या काही लोकांना हे पचले नाही म्हणून त्यांनी खोटे आरोप केले व त्यात मला गोवले, असे तेलतुंबडे यांनी याचिकेत म्हटले आहे.

‘तपास यंत्रणेला माझ्याविरुद्ध काहीही पुरावे सापडले नाहीत. मी सीपीआय(एम)शी संबंधित आहे, हेही दर्शविणारे पुरावे एनआयएकडे नाहीत. तेलतुंबडे स्वतः सीपीआय(एम)च्या विचारधारेचे टीकाकार आहेत. तपासयंत्रणेने केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत,’ असे तेलतुंबडे यांनी याचिकेत म्हटले आहे.