Join us

रेवदंडा येथे दूरध्वनी सेवा ठप्प

By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST

रेवदंडा परिसरातील दूरध्वनी कार्यालयातील विद्युत पुरवठा मंगळवारी सकाळी खंडित झाल्यामुळे दूरध्वनी सेवाही कोलमडली.

रेवदंडा : रेवदंडा परिसरातील दूरध्वनी कार्यालयातील विद्युत पुरवठा मंगळवारी सकाळी खंडित झाल्यामुळे दूरध्वनी सेवाही कोलमडली. तब्बल ३६ तास उलटूनही ही सेवा सुरू न झाल्याने सर्व दूरध्वनी डेड झाले असून बँका, व्यापारीवर्ग व अन्य नागरिकांना याचा फटका बसला आहे.अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. या बंद पडलेल्या दूरध्वनीमुळे अनेक नागरिकांनी अलिबाग शहराकडे धाव घेतली त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय झाला.या संदर्भात दूरध्वनी केंद्राचे कनिष्ठ अभियंता अशोक खैरे यांच्याशी संपर्क साधला असता केंद्रात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तांत्रिक बिघाड झाला आहे. घर मालकाचे केंद्राचे घरभाडे देण्यास उशीर झाला असल्याने त्यांनी केंद्राला टाळे लावल्याने तांत्रिक बिघाड शोधून काढणे कठीण आहे असे सांगितले. याबाबत अलिबाग-रायगडचे उपमंडळ अभियंता ग्रामीण विभाग यांच्याशी संपर्क साधला असता भाडे देण्याची प्रक्रिया चालू असून ते देऊन केंद्र तात्काळ सुरू केले जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)