मुंबई : होळीच्या आदल्या दिवशी सकाळीच भारतीय रिझर्व्ह बँकेने पाव टक्क्याच्या दर कपातीची घोषणा केली आणि अवघ्या अर्ध्या तासात शेअर बाजाराने ३० हजारांच्या ऐतिहासिक अंशांना स्पर्श करीत तेजोरंग उधळत होळी-धूळवड साजरी करण्यास सुरुवात केली. व्याजदर कपातीमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य कर्जांवरील हप्ता कमी होण्याची आशा आहे. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पत धोरणाखेरीज रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली. त्यामुळे आता अर्धा टक्का व्याजदर कपात झाली. परंतु गेल्यावेळी पाव टक्का दरकपात होऊनही त्याचा फायदा बँकांनी ग्राहकांना दिला नव्हता. तसाच या वेळीही मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत बँकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)च्अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा असलेली वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री जेटलींनी निश्चित लक्ष्य अधोरेखित केले आहे व त्या दृष्टीने कार्यवाही दिसून येत आहे. च्दुसरीकडे चलनवाढीवर नियंत्रण मिळवण्यात रिझर्व्ह बँकेलाही यश येताना दिसत आहे. हा ट्रेंड असाच राहिला तर चालू वर्षात किमान अर्धा टक्के व्याजदर कपात करण्यास वाव असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बाजारात तेजोरंग
By admin | Updated: March 5, 2015 02:04 IST