Join us  

नगरमधील युवकाचा मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:54 AM

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच, बुधवारी मंत्रालयाबाहेर २५ वर्षीय दिव्यांग तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच, बुधवारी मंत्रालयाबाहेर २५ वर्षीय दिव्यांग तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. अविनाश शेटे असे या युवकाचे नाव असून, तो नगर जिल्ह्यातील गोणेगाव (ता. नेवासे) या गावचा आहे.अविनाशने २०१३ साली सहायक कृषी अधिकारी या पदासाठी परीक्षा दिली होती. यात कमी गुण मिळाल्याने फेरतपासणी करण्याची मागणी अविनाशने केली होती. मात्र, सरकारकडून कार्यवाही होत नसल्याने मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने अनर्थ टळला. यानंतर, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी अविनाश शेटेला बोलावून त्याच्या पेपरच्या फेरतपासणीचे आदेश दिले.सांगलीत दोन महिलांनी अंगावर ओतून घेतले रॉकेलसांगली : तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याने, मिरजेतील २ महिलांनी पोलीस मुख्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.मुमताज आसिफ शेख व अमिनाबी घटकर अशी त्यांची नावे आहेत. एका कुटुंबाकडून त्यांना त्रास सुरू होता. मंगळवारी त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची दखल घेतली नाही. यामुळे वैतागून त्यांनी हे पाऊल उचलले.

टॅग्स :मुंबईआत्महत्यामंत्रालय