Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉटनग्रीन स्थानकावर तरुणीची छेडछाड

By admin | Updated: May 25, 2017 00:42 IST

कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर एका तरुणीची छेडछाड करून गर्दुल्ल्याने पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर एका तरुणीची छेडछाड करून गर्दुल्ल्याने पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या छेडछाडीच्या प्रकारामुळे स्थानिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.सकाळी कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूने फलाट क्रमांक १च्या दिशेने जाताना मागून कुणीतरी येत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. मागे वळून पाहत असताना मागील गर्दुल्ल्याने चोरटा स्पर्श करत तिथून आल्यापावली पळ काढला. घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी हाक देताच फलाटावरील काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. संबंधित गर्दुल्ल्याचा पाठलाग केला असता त्याने पूर्वेकडील राम मंदिर दिशेने पळ काढला.घाबरलेल्या तरुणीने या प्रकरणी पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. रात्रीच्या वेळी सर्रासपणे या ठिकाणी गर्दुल्ले आणि रोडरोमियो स्थानकाखाली बसलेले असतात. आता तर दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड सुरू झाल्याने महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तरी पोलिसांनी या ठिकाणी गस्त पथक तैनात करावे, अशी मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनचे आशिष चव्हाण यांनी केली आहे.