Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक, अ‍ॅथलेटीक्सचा निकाल जाहीर

By admin | Updated: January 9, 2015 00:01 IST

पोलीस क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई संघ सहभागी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आदी जिल्ह्यांचा सहभाग असलेल्या ४१व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१४ सिंधुदुर्गअंतर्गत सांघिक व अ‍ॅथलेटीक्स क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून सांघिक क्रीडा प्रकारात व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई आदी संघ विजयी झाले. तर हॅँडबॉल क्रीडा स्पर्धेत नवी मुंबई व रत्नागिरी संघाने विजय मिळविला. त्याचबरोबर खो-खो पुरूष गटात रायगड, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण तर खो-खो महिला गटात रत्नागिरी, नवी मुंबई व रायगड संघाने विजय संपादीत केला.अ‍ॅथलेटीक्स क्रीडा प्रकारात १० हजार मीटर धावणे क्रीडा प्रकारात पुरूष गटात नवी मुंबईचा प्रशांत सुर्वे याने प्रथम क्रमांक तर ठाणे ग्रामीणचा आदेश घोडके याने द्वितीय व सिंधुदुर्गचा दीपक वसावे याने तृतीय क्रमांक मिळविला. ८०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात पुरूष गटात रायगडचा नितीन पाटील याने प्रथम, नवी मुंबईचा प्रशांत सुर्वे याने द्वितीय, रत्नागिरीचा सुहास मांडवकर याने तृतीय तर महिला गटात सिंधुदुर्गची तृप्ती कुळये हिने प्रथम, रायगडची कविता रेवडेकर हिने द्वितीय, नवी मुंबईची माधुरी वानरवेले हिने तृतीय क्रमांक पटकावला. लांबउडी क्रीडा प्रकारात पुरूष गटात नवी मुंबईच्या सचिन कोळी याने प्रथम, निवृत्ती भोईर याने द्वितीय व रायगडच्या करण पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच लांबउडी क्रीडा प्रकारात महिला गटात ठाणे ग्रामीणची वैशाली गुंजाळ हिने प्रथम, नवी मुंबईची अश्विनी हडवळे हिने द्वितीय, रत्नागिरीची मयूर खांबे हिने तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय थाळीफेक पुरूष गटात नवी मुंबईचा तुषार शिंदे याने प्रथम, रत्नागिरीच्या नागनाथ पाचवे याने द्वितीय तर नितीन पवार याने तृतीय क्रमांक मिळविला.थाळीफेक महिला गटात ठाणेची स्वाती ढोले हिने प्रथम, नवी मुंबईच्या स्वाती वाळुंज हिने द्वितीय, शुभांगी लोहार हिने तृतीय क्रमांक मिळविला. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गचा राहूल काळे प्रथम२०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात पुरूष गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राहूल काळे याने प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबईचा सचिन कोळी याने द्वितीय, रत्नागिरीचा वैभव पंडीत याने तृतीय तर महिला गटात नवी मुंबईची संध्या पार्टे हिने प्रथम पटकावला. तर रत्नागिरीच्या सुवर्णा बारगुडे हिने द्वितीय तर सोनाली गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला.