Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीच्या वतीने शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

मुंबई : गोरेगावातील रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टच्यावतीने देश-विदेशातील २३९ शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन ...

मुंबई : गोरेगावातील रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टच्यावतीने देश-विदेशातील २३९ शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शनिवारी करण्यात आले हाेते.

प्रमुख पाहुण्या फ्रान्सच्या क्विन नाडिया हरीहीरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र अगरवाल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. बाळकृष्ण इनामदार, वेंकटराव गडवाल उपस्थित होते. रोटरी कल्ब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टचे प्रेसिडेंट विशाल मुंद्रा यांनी पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षक आणि समुपदेशकांचे स्वागत केले.

या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे. या कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख डॉ. सीमा नेगी, सचिव ज्योत्स्ना गायकवाड, रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लबचे सदस्य, रोटरी डिस्ट्रिक्टमधील मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी मुंबईतील महापालिकेतील शिक्षक, समुपदेशक, अनुदानित शाळांतील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, देश आणि विदेश पातळीवरील शिक्षकांची निवड करण्यात आली होती. अमेरिका, इंग्लंड, ब्राझिल, सौदी अरेबिया, ओमान, मॉरिशस, ग्रीस, अर्जेंटिना आणि पाकिस्तान या देशातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा समावेश होता.