ठाणो : ठाणो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसी) उल्हासनगर-3 येथील शाखेतून विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीची 5क्क् रुपयांची रक्कम मिळणो अपेक्षित होते. पण, खात्यावरील जमा रक्कम न बघता स्लीपवरील पाच हजार रुपयांच्या अंकास अनुसरून तिला रक्कम दिली. पण, सुमारे एक तासानंतर जादा पैसे गेल्याचे उघड होतास येथीलमहिला कॅशिअरची एकच धावपळ झाली.
सुमारे एक आठवडय़ापूर्वी बँकेत ही घटना घडली असली तरी शिक्षकवर्गात मात्र या घटनेविषयी चर्चा असून बँकेच्या गलथान कारभाराबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. उल्हासनगरच्या शांतिग्राम शाळेच्या एका विद्यार्थिनीने तिच्या बँक खात्यातील शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी स्लीपवर 5क्क् ऐवजी पाच हजार रुपये अंकी व अक्षरी लिहिले. पण, या कर्मचा:यांसह कॅशिअरच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे खात्यातील रकमेची खातरजमा न करता तिला पाच हजार रुपये मिळाले.
परंतु, एक तासानंतर जेव्हा बँकेची ऑनलाइन सुविधा सुरू झाली, तेव्हा कॅशिअरच्या लक्षात आले की, 5क्क् ऐवजी विद्यार्थिनीला पाच हजार रुपये दिल्याचे उघड झाले. तेव्हा मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी त्या विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या मोठय़ा रकमेची विचारपूस केली तरी तिने उलटसुलट उत्तरे देऊन रक्कम घेतली, असे कॅशिअरकडून सहका:यांना सांगण्यात आले. त्यानंतर, त्या विद्यार्थिनीच्या शाळेचा शोध घेतला असता ती शांतिग्राम शाळेची विद्यार्थिनी असल्याचे लक्षात आले आणि बँकेच्या यंत्रणोने धावपळ करून जादा गेलेली रक्कम बँकेत आणण्यासाठी प्रय} केले. पण, बँकेच्या संबंधित अधिका:यांसह कर्मचा:यांचा हा गलथानपणा असल्याचे मात्र बँक मान्य करीत नाही.
जादा घेतलेली रक्कम परत घेण्याचा अधिकार बँकेला आहे. यामुळे कदाचित त्यांनी शिष्यवृत्तीची ती रक्कम परत घेतली असावी. पण, यासंदर्भात लवकरच चौकशी करतो.
- किशोर कुडव, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीडीसी बँक, ठाणो