मुंबई : मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन प्रतिस्पर्धी वीज कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठीची चढाओढ सुरूच असून, जानेवारी २०१४ सालापासून टाटा पॉवरच्या ग्राहकसंख्येत १ लाखाने भर पडली आहे. तशी घोषणाच कंपनीने बुधवारी केली असून, वाढत्या ग्राहकसंख्येमुळे टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांची एकूण संख्या आता ५ लाख ५० हजारांवर पोचली आहे.दर महिन्याला ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात कमी वीजदर कंपनी देत असल्याने अनेक स्तरांतील ग्राहक टाटा पॉवरची वीज स्वीकारत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण टाटा पॉवरच्या एकूण ग्राहकसंख्येच्या तुलनेत जवळपास ७० टक्के आहे. कंपनीची ३२ ग्राहक सेवा केंद्रे व बिल कलेक्शन सेंटर्स मुंबईत कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)जानेवारी २०१४ सालापासून टाटा पॉवरच्या ग्राहकसंख्येत १ लाखाने भर पडली आहे. तशी घोषणाच कंपनीने बुधवारी केली.
टाटा पॉवरचे ग्राहक लाखाने वाढले
By admin | Updated: January 8, 2015 02:06 IST