Join us

25 हजार टूरिस्ट वाहने ठरणार टार्गेट

By admin | Updated: December 10, 2014 02:49 IST

नवी दिल्लीत उबर टॅक्सीचालकाने केलेल्या बलात्कारानंतर मुंबईतील टॅक्सीसेवेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुंबई : नवी दिल्लीत उबर टॅक्सीचालकाने केलेल्या बलात्कारानंतर मुंबईतील टॅक्सीसेवेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टूरिस्ट वाहनचालकांची माहिती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 25 हजारांपेक्षा जास्त टूरिस्ट वाहनांवर काम करीत असलेल्या चालकांची माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही माहिती घेण्यास वाहतूक पोलीस व आरटीओकडून विशेष मोहीम घेतली जाणार आहे. 
नवी दिल्लीतील घटनेनंतर मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी खासगी टॅक्सीचालकांची माहिती घेण्याचा निर्णय घेऊन तसे आदेशच पोलिसांना दिले. यानंतर मंगळवारी वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या झालेल्या बैठकीत खासगी टॅक्सीचालकांची माहिती कशी घेता येईल, यावर चर्चा करण्यात आली. सध्या मुंबईत फ्लिट टॅक्सीसेवेबरोबरच टूरिस्ट वाहनेही धावत आहेत. फ्लिट टॅक्सीचालकांकडे बॅच असल्याने हा बॅच देण्यापूर्वी त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन (माहिती) केले जाते. मात्र टूरिस्ट (पर्यटक) टॅक्सी वाहने ही वाहतूक वाहन लायसन्सवरच (ट्रान्सपोर्ट वेहिकल लायसन्स) धावत असल्याने आणि त्यांच्या चालकाजवळ बॅच नसल्याने अशा वाहनचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही आणि त्यामुळे त्यांची माहिती पोलिसांजवळ उपलब्ध नसते. हे पाहता अशा टूरिस्ट वाहनचालकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त टूरिस्ट वाहने धावत असून, त्यांच्यावर कार्यरत टॅक्सीचालकांची माहिती घेतली जाईल, असे सह पोलीस (वाहतूक) आयुक्त बी. के. उपाध्याय यांनी सांगितले.   
 
..तर रेल्वे बंद करणार?
उबर या कॅब सव्र्हिस कंपनीची सेवा बंद करण्याच्या निर्णयावरून सरकारमधील दुफळी पुन्हा एकवार स्पष्ट झाली आह़े एम़ वेंकय्या नायडू आणि अरुण जेटली यांच्यापाठोपाठ केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ‘उबर’वर दिल्लीत बंदी लादण्याच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आह़े उद्या रेल्वे वा बसमध्ये एखादा अपघात झाला तर त्या सेवाही बंद करणार का, असा सवाल गडकरींनी उपस्थित केला.-वृत्त/1क्