Join us
Daily Top 2Weekly Top 5

कासा परिसरात तापाची साथ

By admin | Updated: March 11, 2015 22:28 IST

डहाणू तालुक्यातील कासा, सायवन भागात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांत तापाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा, सायवन भागात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांत तापाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.पाच-सहा दिवसांपासून ही साथ पसरली असून हा ताप व्हायरलसदृश असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सर्दी, डोकेदुखी, घसा दुखणे, हातपाय दुखणे ही लक्षणे दिसत आहेत. वातावरणात झालेला बदल, पावसामुळे निर्माण झालेला गारवा तर दोन-तीन दिवसांपासून अचानक वाढलेली उष्णता या कारणांमुळे या तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा ताप औषधोपचारानंतर तीन ते चार दिवसांनंतर रुग्ण बरा होत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. कासा, सायवन भागांत तापामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. (वार्ताहर)