Join us

तानसात लाकूड तस्करी

By admin | Updated: November 28, 2014 22:46 IST

अभयारण्यातील वांद्रेगावाशेजारच्या ढुबीचापाडा येथे चोरटी लाकूड वाहतूक करणारा ट्रक लाखो रुपयांच्या लाकूड मालासह ताब्यात घेण्यात आला आहे.

शहापूर : तालुक्यातील तानसा अभयारण्यात सतत लाकूड तस्करी सुरू असून शुक्रवारी सकाळच्या सुमारास वन अधिका:यांना मिळालेल्या माहितीनुसार अभयारण्यातील वांद्रेगावाशेजारच्या ढुबीचापाडा येथे चोरटी लाकूड वाहतूक करणारा ट्रक लाखो रुपयांच्या लाकूड मालासह ताब्यात घेण्यात आला आहे.
आदित्य ट्रान्सपोर्ट असे लिहिलेल्या ट्रकमधून अत्यंत दुर्मीळ जातीचे शिसव 54 नग, साग 143 नगांची चोरटी वाहतूक होत असताना वन अधिका:यांनी तो ताब्यात घेतला आहे. एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकचालकासह सहा लाकूड तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले, असे वनक्षेत्रपाल बी.टी. कोलेकर यांनी सांगितले.  एके काळी रक्तचंदनाची अवैध तोड करणा:यांनी आता आपल्या कु:हाडी शिसव आणि सागावर चालविण्यास सुरूवात केल्याचे दिसते आहे.(वार्ताहर)